मन असावे दयाळू,
प्रेम उदात्त, उदंड,
वाहे जणू झरझर।।
देणे घेणे भरपूर, त्यात माप कशाला।।
मन जोडावे मनाने,
उगी नको ती वणवण,
का हवीत नाती गोती।।
वर्चस्व एकाचे अन धावपळ एकाची, तडजोड कशाला।।
मन असावे निर्मळ,
सुंदर विचाराने,
प्रसन्न, प्रेमळ।।
राग-द्वेष सोडून, मग उगीच उगीच अहंकार कशाला।।
मन वाचावे मनाने,
ओळखून खूण
आपल्या कुणाची।
नसेल जर वाचायचे मन, मग उगीच उगीच प्रयत्न कशाला।।