एकटेपणा..
एकान्त हा आहे की आहे एकटेपणा..
शुक्ष्म आहेत की आहेत विशाल वेदना ..
कधी वाटे बसावे गप्प तर कधी करावी गर्जना
संकुचित वर्तुळ स्वार्थी की सेवे सर्वजना,
काय करावे सांग रे माझ्या मना,
एकान्त हा आहे की आहे एकटेपणा
क्षिताजावर सूर्यास्त आहे की चंद्र उगवताना
मनोमनी पूजा माझी की देवळात कीर्तना
वेळ ही कातर, नको का शांतता अंगणा..
एकान्त हा आहे की आहे एकटेपणा
संपूर्णता असून का अजून आहेत झंखना,
तृप्त जीवा का प्रगतीपर गती प्रतीदिना
गोंधळात शांत मन, जग मुक्त जीवना
नको असू रिकामा, नको असू एकटा..भयंकर एकटेपणा
No comments:
Post a Comment